Corona & Nature| कोरोनामुळे हानी मनुष्यालाच!! तर मग फायदा कुणाला ?

चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना Corona व्हायरसने पाहता पाहता अवघ्या दोन चार महिन्यांमध्ये संपूर्ण जगात थैमान घातलं. लाखोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागते. कित्येकांना यात आपले प्राणही गमवावे लागले. अशा या संपूर्ण परिस्थितीत संभाव्य हानी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून अनेक राष्ट्रांमध्ये सक्तीच्या लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले. देशच्या देशच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बहुतांश, जवळपास सगळीच हवाई वाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतून इतकंच नव्हे तर नागरिकांचं दैनंदिन जीवनही ठप्प झालं.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी संपूर्ण जग एकवटलं आहे. आपआपल्या परिने त्यांचा लढा सुरुच आहे. या साऱ्यामध्ये प्रत्येकजण एखाद्या दिलासादायक बातमीच्या शोधात आहे. सर्वत्र भीतीचं आणि नकारात्मक वातावरण पाहायला मिळत असतानाच आता एक अतिशय आनंदाची अशी माहिती समोर आली आहे. ज्याचा संबंध संपूर्ण मानव प्रजाती, सजीव सृष्टी किंबहुना संपूर्ण पृथ्वीशीच आहे. ही बातमी आहे ओझोनच्या थराची. पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोनच्या थराचं आतार्यंत झालेलं नुकसान पाहता बरीच चिंता व्यक्त केली जात होती. पण, आता मात्र सागरी लहरी, ऋतूचक्र या साऱ्यावर थेट परिणाम करणारा ओझोनचा थर बऱ्याच अंशी पूर्वपदावर येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनेक मानवी कृतींमुळे या ओझोनच्या थराचा ऱ्हास होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सूर्यापासून निघणारी घातल किरणं शोषणाऱ्या ओझोनच्या थराला छिद्रही झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, आता मात्र हे छिद्रही आपोआप भरत असल्याची बाब समोर येत आहे.  युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरच्या संशोधकांच्या निदर्शनास आल्यानुसार पृथ्वीच्या दक्षिण भागात असणाऱ्या अंक्टार्टिका भागावर असणाऱ्या ओझोनच्या थरावरील छिद्र आता भरु लागलं आहे. कारण, चीनच्या बाजून जाणारं प्रदूषण आता त्या दिशेला जात नाही.

सूर्याकडून येणारे अतिनील किरण हे सजीवांच्या दृष्टीने घातक आहेत. या अतिनील किरणांपासून सजीवांचे रक्षण करणारे सुरक्षाकवच म्हणजे वातावरणातील ओझोन वायूचा थर. अतिनील किरणांना शोषून घेऊ शकणाऱ्या या ओझोनचा रेणू हा ऑक्सिजनचे तीन अणू मिळून तयार झालेला आहे. वातावरणातील ओझोनची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर ते पन्नास किलोमीटर उंचीवर असणाऱ्या स्थिरावरणात (स्ट्रॅटोस्फिअर) होते. वातावरणातील ओझोनचे प्रमाण मोजण्यासाठी साधारणपणे वर्णपटमापकाचा वापर केला जातो. ओझोनच्या रेणूंचे वातावरणातील प्रमाण स्थिर असणे अपेक्षित आहे.

ओझोनची मापने १९५७ सालापासून जागतिक पातळीवर नियमितपणे केली जात आहेत. १९८० सालानंतर, ब्रिटिश अंटार्क्टिक सव्‍‌र्हे या मोहिमेतील संशोधकांना, अंटार्क्टिका येथे बसवलेल्या मापकांत वेगळीच गोष्ट आढळली. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तिथल्या हिवाळ्यानंतरच्या महिन्यांत, ओझोनचे प्रमाण १९५७ सालापासून आतापर्यंत कधीही नव्हते इतके कमी झालेले आढळले. १९८५ साली ब्रिटिश संशोधकांनी आपली ही निरीक्षणे ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित केली. या संशोधकांनी ओझोनच्या प्रमाणातील या घटीसाठी क्लोरोफ्लुरोकार्बन या गटातील रसायने जबाबदार असल्याची शक्यता व्यक्त केली. अल्पकाळातच कृत्रिम उपग्रहावरील मापकांद्वारे या ब्रिटिश संशोधकांच्या निरीक्षणांची पडताळणी केली गेली. उपग्रहाने केलेल्या या पडताळणीतून, दक्षिण ध्रुवावरच्या वातावरणातील विस्तृत भागावरील ओझोनचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर घटले असल्याचे स्पष्ट झाले.

वातावरणाचा हा भाग तेव्हापासून ‘ओझोनचे छिद्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ओझोनचे प्रमाण कमी होण्यास, कृत्रिम खतांच्या वापराद्वारे निर्माण होणारा नायट्रस ऑक्साइड, रेफ्रिजरेटरमध्ये तसेच फवारे मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांतील क्लोरोफ्लुरोकार्बन व इतर अनेक रसायने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. १९७०च्या दशकात केलेल्या, वातावरणातल्या ओझोनच्या या रसायनशास्त्रविषयक संशोधनासाठी डच संशोधक पॉल क्रुटझेन, तसेच अमेरिकन संशोधक मारिओ मोलिना व शेरवूड रोलँड यांना १९९५ सालच्या नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले. या संशोधनाचा परिपाक म्हणून १९८९ साली अस्तित्वात आलेल्या ‘माँट्रिअल प्रोटोकॉल’ या नियमप्रणालीनुसार ओझोन थराला घातक ठरणाऱ्या रसायनांच्या निर्मितीवर आणि वापरावर अनेक बंधने आली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून, काही वर्षे रुंदावत चाललेले हे छिद्र आता पुन्हा भरू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे लोकं घरात असली आहे. सामान्य नागरिकांना हा लॉकडाऊन नकोसा वाटत असला तरीही या लॉकडाऊनची सकारत्मक बाजू म्हणजे निसर्गाचं झालेलं नुकसान आता मोठ्या प्रमाणात भरून निघालं आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार, उत्तर धुव्रावरील ओझोन लेअरवरील छिद्र आता भरून निघालं आहे. दरम्यान मार्च 2020 मध्ये संधोधकांना पहिल्यांदा हे छिद्र दिसलं होतं मात्र आता The Copernicus Climate Change Service (C3S) आणि Copernicus Atmosphere Monitoring Service (CAMS) या युरोपियन हवामान खात्याची माहिती देणार्याo संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.  वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार उत्तर धुव्रीय भागात म्हणजेच आर्कटिकवरील सुमारे 1 मिलियन वर्ग किलोमीटरचं ओझोनवरील छिद्र आता ठीक झालं आहे. दरम्यान यामागे लॉकडाऊननमधील कमी झालेली प्रदुषणाची पातळी नसून ध्रुवीय भागातील थंड हवा आणि इतर कारणं आहेत

नैसर्गिक बदलांमुळे ओझानच्या थरात मोठ्या प्रमाणत घट झाली होती. तर उत्तर ध्रुवावर आर्क्टिकच्या ओझोन थरात  एक मोठं छिद्र पडलं होतं. पण आता हे छिद्र भरून निघल असून   त्या छिद्राचा आकार बऱ्या पैकी छोटा झाला आहे. हा चमत्कार झालाचं कसा यावर शास्त्रज्ञांनी स्प्ष्टीकरण  दिले आहे

वायू प्रदूषणात झालेल्या सुधारणेमुळं हे छिद्र बंद झालं असावं. परंतु शास्त्रज्ञांनी यहा युक्तिवाद नाकारला आहे आणि त्यामागील खरं कारण सांगितलं आहे. कॉपरनिकन अॅटमॉस्फियर ऑब्झर्वेशन सर्व्हिसनुसार,  हे छिद्र बंद होण्याचं कारण स्ट्रॅटोस्फीयर गरम होण्यामुळे आहे. एप्रिलपासून उत्तर ध्रुवाचं तापमान वाढू लागतं. यामुळे, आर्क्टिकच्या वरील स्ट्रॅटोस्फेरिक थर देखील गरम होऊ लागला आणि ओझोन थरात ओझोन वाढू लागतो. त्यामुळेच ते छिद्र बंद झालं  आहे.

दरम्यान ऑब्झर्वेशन सर्व्हिसने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘2020 मध्ये उत्तर गोलार्धातील ओझोनवरील छिद्र बंद झालं आहे. या कमी तापमानामुळे मार्चमध्ये बनलेल्या या मोठ्या छिद्रानं शास्त्रज्ञांना धक्का बसला. यामुळे, अप्रिय घटनांची भीती देखील व्यक्त केली जात होती. पण असं काहीतरी घडण्यापूर्वीच हे छिद्र बंद झालं.

एवढेच नव्हे तर वायू प्रदूषण मध्ये ही बदल दिसून येतोय….. आपल्याकडील दिल्ली मधील सर्वात जास्त प्रदूषण कमी झालेलं आहे…. औद्योगिक संस्था, chemical factory, गाड्यां मधील विषारी वायू , या सर्वामध्ये दिवसेदिवस प्रदूषण वाढत चाललं होत . परंतु आपण बघितली असेल , आताची latest news , दिल्ली मधील प्रदूषण कमी झालेलं आहे… एवढेच नव्हे तर निसर्गाचं अनमोल आणि रहस्यमय दर्शन आपल्याला झालेलं आहे. हा बदल कदाचित या lockdown मुळेच शक्य झालेलं आहे..

  मी अस नाही म्हणत या मुळे आपल काहीच नुकसान झालेले नाही… देशाच्या  अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलेला आहे.. नवीन सुरझालेले उद्योग धंदे डबघाईला आलेले आहे… एवढेकाय मुलाचे शाळा , कॉलेज. , क्लास , इतर काही सगळ थांबलेलं आहे…आपण आपलएखादी गोष्ट हरवलेली की ती शोधण्यासाठी सैरभैर होतो , जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत चैन नाही पडत…. इकडे तर निसर्गाचं क्र च बिघडलं आहे…. त्याने फक्त सृष्टी संकेत दिलआहे , तुम्ही प्रगती करपण , अशप्रगती काय कामाची , जिच्यामुळे एकद्याच नुकसान होअसेल…. प्रगतकर, मोठे व्हा , पण निसर्गाला इजा पोहचू नक , नाहीतर येणाऱ्या प्रत्येसंकटाला फक्त आणि फक्त आपणजबाबदार अस……?????

By… आरती पवार

click here to read more posts on environment…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *