बलात्कार : सामाजिक समस्या

आपल्या भारताची संस्कृती हि पुरुषप्रधान आहे. त्यामुळे महिलांना घरामध्ये दुय्यम स्थान आहे. आज हि परिस्थिती बदललेली आहे, असं जरी म्हटलं तरी हि परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत नाही. समाज आजही मुलींना कमजोर आणि एक उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहत आहे. आज आपण पाहतो बलात्कार झालेल्या मुलीला समाज वेगळ्या नजरेने पाहतो,  जणू काही  तिचीच आहे.

आपण जर साध्याचीच गोष्ट डॉ. प्रियांका रेड्डी तिच्यावर बलात्कार झालेला होता. साधारण हि गोष्ट 29 Nov.2019 ची आहे. तिच्यावर बलात्कार झाल्यावर काहींनी स्टेट्स टाकले, न्याय मिळावा म्हणून  मागणी केली, वगैरे. पण जेव्हा तिच्या गाडीची टायर पंचर केली गेली,  तिच्यावर जबरदस्ती करण्याचा करण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तिथून कोणीच गेलं नसेल काय ? एकही गाडी तिथून गेली नसेल काय ? एवढा उशीर पण झाला नव्हता कि तिथून कोणीच जाऊ शकणार नाही. ह्याचाच अर्थ असा होतो कि आपण घटना झाल्यावर सतर्क होतो, आणि सरकारला नावे ठेवण्यात गुंग होतो. इथे भारतीय नागरिक म्हणून जबाबदारी नाही का ?

मग यावर सरकारने काही केले नाही का ? केले हि काही कायद्यांमध्ये बदल केले. मुलींना सक्षम करण्यासाठी निर्भया पथक, दामिनी पथक सुरु केले

     आणि त्या कलमानुसार,

कलम 354 कलम 375 कलम 376
 1- स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी बलप्रयोग करणे. 2- लैगिंक छळवणूक व लैगिंक छळवणुकीसाठी शिक्षा 3 – छुपा पाठलाग करणे 1- तीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करणे. 2- तिच्या संमतीने, जेव्हा तिची संमती, तिला किंवा ती ज्या व्यक्तीशी हितसंबंधित आहे. अशा कोणत्याही व्यक्तीस, मृत्यूची किंवा दुखापत करण्याची भीती दाखवून मिळविण्यात आली असेल तेव्हा ; 3- जेव्हा ती संमती कळविण्यास असमर्थ असेल तेव्हा ; 1- बलात्कारासाठी शिक्षा :    अ. पीडित व्यक्तीची मृत्यू घडवून आणल्याबद्दल किंवा पीडित व्यक्तीस कायमस्वरूपी गलितगात्र स्थितीत ठेवण्यास कारणीभूत झाल्याबद्दल शिक्षा.   ब. फारकतीच्या कालावधीत पतीने आपल्या पत्नीशी लैगिंक संभोग करणे.    क. महिलेबरोबर लैगिंक संभोग केल्याबद्दल शिक्षा.   ड. टोळीकडून शिक्षा.

( साधन :  प्रमुख फौजदारी कायदे या पुस्तकातून )

वरील कलम ” भारतीय दंड संहिता “,1860 या अंतर्गत येतात. त्या मध्ये कलम 354, कलम 375, कलम  376, या मध्ये बदल करून, कलम चालू केले आहेत.

        एवढे करूनही आपण सरकारला नावे ठेवण्यात गुंग राहतो, मात्र आपण त्या कोणत्याही योजनांना पाठिंबा देत नाही. योग्य तो प्रतिसाद सुध्या समाज योग्य पद्धतीने करत नाही.

      मग याला जबाबदार कोण ?? समाज, सरकार, कि होणारे संस्कार.

    मग यासाठी काय करायला हवं, कोठेतरी सरकारने आपले निर्णय कठोर घेऊन लवकरात  – लवकर अमंलबजावणी करायला पाहिजे. समाजाने आपले विचार बदलण्याची गरज आहे. आपले आचार – विचबदलण्याची आता वेळ आलेली आहे.      खरंच आता, विचार करण्याची गरज आहे कि, आपल्या मुली सुरक्षित आहेत काय ??

विश्लेषण :-

Table No. 1

भारतातील बलात्काराची वाढती आकडेवारी (वर्षानुसार )

वर्ष बलात्कार करणाऱ्याची आकडेवारी ( 2010 – 2017 )
2009 – 10 22,172
2010 – 11 24,206
2011 – 12 24,923
2012 – 13 33,707
2013 – 14 36,735
2014 – 15 34,651
2015 – 16 38,947
2016 – 17 33,658

                 ( साधन : गूगल वरून माहिती मिळवली.. )

Interpretation :

        वरील टेबल क्र. 1 वरून असे लक्षात येते कि, बलात्कारणाऱ्याची संख्या दिवंसेदिवस वाढत चालली आहे. जर आपण तसं पाहिलं तर मागील 10 वर्षाचा अढावानुसार 2009 – 10 पासून ते 2016 – 17 पर्यंत हि आकडेवारी 11458 एवढी वाढली आहे. म्हणजेच 51.68 % नी बलात्काराची करणाऱ्याची संख्या वाढली आहे. मग यामध्ये सरकार कमी पडत आहे कि समाज ? ह्याचा विचार करणे गरजेचे आहे.

Table No.3

Analysis of  famous cases of victims

 पीडित मुलीचे नाव पिडीत मुलीचे वय बलात्कार करणाऱ्याचे नाव आणि वय
निर्भया कांड ( 16/12/2012) 23 मुकेश          – 32    रामसिंग     – 32 विनय शर्मा  – 26    पवन गुप्ता  – 24                 अक्षय ठाकूर – 33
कोपर्डी ( 13/07/2016 ) 15 जितेंद्र उर्फ बाबू लाल शिंदे – 25 संतोष गोरख भावळ         –  30 नितीन गोपीचंद भैलुमे  –  26
डॉ. प्रियांका रेड्डी ( 29/11/2019 ) 26 एम.डी.अरिफ ( लॉरी ड्राइवर ) – 26 जोल्लू नवीन                             – 20 जोल्लू शिवा                             – 20 चेन्नकेशवुलु                             – 20

 ( साधन : वर्तमानपेपर,  जुने साप्ताहिक, आणि गूगल चा वापर केला आहे )

Interpretation :

     वरील माहिती हि काही प्रसिद्ध झालेल्या केसेस ची माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये निर्भया कांड, कोपर्डी, डॉ. प्रियांका रेड्डी अशा तीन केसेस ची  माहिती घेण्यात आलेली  आहे.

    आपण जर या माहितीकडे नीट लक्ष देऊन पाहिलं तर असं लक्ष्यात येते कि, ज्या वयामध्ये त्यांनी त्याच्या उज्ज्वल भविष्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्या वयात ते हे असे कृत्य करत आहेत. बलात्कार करणाऱ्याचे वय पहिले तर असे लक्षात येते कि, साधारण 20 – 30 वयोगटातील हि, असे कृत्य करताना काही वाटलं नसेल का ? याला कारण काय, तर हि तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली, व्यसनग्रस्त असलेली हि असे कृत्य करतात.

   मग यासाठी सरकारने काय केले पाहिजे ? बलात्काराचा गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपीना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे. नाहीतर 08 वर्षे झाली  आज निर्भया कांड ला तरीही सरकार अजून शिक्षा देत आहे. असे नको व्हायला पाहिजे.

   लवकरत लवकर शिक्षा, न्याय दिला पाहिजे. आणि ह्या प्रकारच्या घटना समाजामध्ये कमीत कमी किंवा घडणार नाहीत, यावर आपण सर्वानी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.

विभाजन : सुरक्षित आणि असुरक्षित राज्ये

Interpretation :

        वरील माहिती नुसार असे लक्षात येते कि, सर्वात जास्त बलात्काराच्या घटना ह्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी आहेत. कारण तेथील असलेली सामाजिक परिस्तिथी आणि विचार. तसं पाहिलं तर आज अशी परिस्तिथी आहे कि, महिलांना किंवा मुलींना घराच्या बाहेर पडणं कि अशक्य आहे. आणि काही अशा हि घटना घडल्या आहेत कि, मुलगी जन्मली टाका मारून. का ? आणि कशासाठी ?. फक्त एवढेच कि, ते आपले विचार बदलू नाही शकत.

    आणि आपल्याच देशातील  अरुणाचल प्रदेश,  सिक्कीम, नागालँड हि राज्ये सुरक्षित राज्ये म्हणून ओळखली जातात. कारण हि राज्ये पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत. त्यामुळे त्याच्या विचारामध्ये बदल झालेले आहेत. मुलगा – मुलगी याना  समान वागणूक दिली जाते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, तिथे मुलींना सन्मान दिला जातो. आपल्याकडे अशी पद्धत आहे कि, लग्नानंतर मुलगी मुलग्याकडे जाते पण येथे मुलगा मुलीच्या घरी जातो, लग्नानंतर. हि पुरुषप्रधान संस्कृती येथे मोडताना दिसते.  यासगळ्या माहितीवरून  असा प्रश्न उभा राहतो कि, हि परस्थिती बदलू शकणार नाही का ? मग ह्या साठी काय केले पाहिजे. जेथे बलात्काराच्या घटना जास्त आहेत, तिथे सरकारनं काही केलं नाही का ? समाजाची कोणती जबाबदारी नाही का ? ह्या सगळ्याचा विचार करणे गरजेचे आहे. आज असुरक्षित राज्यांनी सुरक्षित राज्याचा आढावा घेऊन आपलं राज्य सुरक्षित करण्याकडे भर दिला तर नक्कीच हा देश विकसित होईल.

Interpretation :

      वरील चार्ट क्र. 1 वरून आपल्याला असे कळते कि, आपल्या देशात होणाऱ्या मुलीवर बलात्कारापैकी, 22% हे त्याचे मित्रच असतात. 19% हे आपल्या ओळखीतलेच असतात. 4% हे अनोळखी असतात. एवढेच नव्हे तर काही केसेस अशा आढळलेल्या आहेत कि, 9% हे त्याच्याच जोडीदाराने केलेल्या आढळल्या आहेत. आणि सर्वात जास्त प्रमाण हे स्त्रियांना, मुलींना प्रेमात पाडणं, लग्नाचं आमिष दाखवणे आणि तिच्यावर बलात्कार करणे ह्याचे प्रमाण जवळपास 46% आहे.

     आज खरंच कोणत्याही गीष्टीच्या आहारी न जात. डोळसपने पाहणे गरजेचं आहे. कारण समाजामध्ये जर बलात्कार करणाऱ्याचे प्रकार एवढे असेल तर, आज आपल्या मुली, बहिणी, आई खरंच सुरक्षित आहे काय ओ ?

निष्कर्ष :

    वरील माहिती वरून लक्षात येते कि, समाजाने बलात्कार पीडितांना सहानभूती दाखवली पाहिजे. तिच्या  पूर्वसनासाठी मदत केली पाहिजे. न्याय व्यवस्थेने हि तिला लवकरात – लवकर न्याय कसा मिळेल ते बघितले पाहिजे. आरोपीना लवकरात – लवकर अशी शिक्षा मिळाली पाहिजे, कि ज्यामुळे सर्वाना जबर बसेल. समाजाने कायदा हातात घेऊन आरोपीना शिक्षा करणे हा न्याय नव्हे.

तसं पाहिलं तर तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसारामुळे तरुणपिढी त्याच्या आहारी जात आहे. नको त्या वयात नको त्या गोष्टींना सामोरे जात आहे. योग्य त्या लैगिंक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आज आपल्या देशात बलात्काराचे प्रमाण वाढताना दिसते.

हे सगळं थांबवण्यासाठी, याची सुरुवात कुटुंबातूनच व्हायला पाहिजे. स्त्रियांना योग्य तो मान – सन्मान, मुला – मुलींमध्ये भेदभाव न करणे,  मोठ्याचा आदर – सन्मान करणे. मुलींना अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी कणखरपणे समोर जाण्यासाठी ” स्वरक्षणाचे ” प्रशिक्षण दिले पाहिजे.

सरकारने सुरु केलेल्या योजनांना समाजाने प्रतिसाद दिला पाहिजे. कारण कि, सरकारने सुरु केलेल्या योजनांना समाज योग्य तो प्रतिसाद देत नाही. त्यापैकी

Minto App :    निर्भया सखी :    दामिनी पथक  : सुरु केले पण या योजनांना हवा तसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. आताच झालेल्या रेड्डी केस नंतर सरकारने प्रतिसाद अँप सुरु केले आहे. Same Minto App सारखेच, पाहूया हि अँप न्याय देऊ शकता का ? नाहीतर हि पण अयशस्वी म्हणूनच राहील.

मग असा प्रश्न उभा राहतो कि, याला जबाबदार नक्की कोण ??? जर समाजाने ठरवले तर आज हि परिस्थिती बदलू शकते. आपण फक्त समाजाला दोषी ठरवू शकत नाही. जागी वेळा असेही आढळून आले आहे कि,  शासन कोठेतरी अमलबजावणी करण्यास कमी पडत आहे. याचाच अर्थ असा कि, कोठेतरी समाजाचे विचार, शासनाची अमलबजावणी कठोर करणे गरजेचे आहे. कारण आज  समाज्याने ” वैज्ञानिक सृष्टी स्वीकारली आहे पण वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली नाही ” समाज फक्त नावे ठेवण्यात गुंग आहे.  बलात्कार पीडित मुलीला पाठींबा न देता, तिला नावे ठेवण्यात, तिला जणू वाळीत टाकल्यासारखे वागणे.यामुळे ते समाजाला दोषी मानतात.

-By Aarti Pawar

Share

One thought on “बलात्कार : सामाजिक समस्या

  • March 20, 2020 at 10:20 pm
    Permalink

    उत्तम लेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *