रंजन गोगोई यांची निवड म्हणजे असंविधानिक निवड?

माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती निर्देशित सदस्य म्हणुन राज्यसभेत निवड

ranjan gogai

प्रथम माननीय रंजन गोगोई यांची भारताचे महामहीम राष्ट्रपती यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणुन निवड केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐

पण सध्या रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड झाली यावरून त्यांच्यावर करण्यात येत असलेली टीका याला अनुसरून मी काही मुद्दे मांडत आहे.
न्यायव्यस्थेवर व राजकीय क्षेत्रे यामध्ये प्रवास केलेल्या काही गणमान्य व्यक्तींची उदाहरणे –
1) कोका सुब्बा राव -CJI (1966-1967) – यांनी 1967 ला झाकीर हुसेन यांच्या विरुद्ध स्वतंत्र पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी निवडणुक लढवली.
2) मोहम्मद हिदयतुल्ला CJI (1968-1970) – यांनी भारताचे उपराष्ट्रपती पद (1979-1984) भूषवल.
3) रंगनाथ मिश्रा CJI (1990-1991) – यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून राज्यसभा सदस्य (1998-2004) म्हणुन काम केले.
4) पी सथाशिवम CJI ( 2013-2014) मोदी सरकारने यांची केरळ चे राज्यपाल (2014-2019) म्हणुन नेमणुक केली.

हे फक्त CJI च नाही तर इतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जसे
1)बहारुल इस्लाम (हे काँग्रेस चे सक्रिय सदस्य होते. काँग्रेस ने यांना तब्बल १० वर्षे राज्यसभेवर पाठवले त्यानंतर त्यांना लगेच १९७२ ला गोहत्ती न्यायलयाचे न्यायाधीश म्हणुन नेमणुक केली, त्यानंतर ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ही झाले.
2)फातिमा बीबी- या भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश. 1997 त्यांना तमिळनाडू च्या राज्यपाल म्हणुन नियुक्ती दिली.
ही फक्त काही उदाहरणे आहेत.


ही उदाहरणे मी मा. रंजन गोगोई यांची वकिली करण्यासाठी करत नाही. तर त्या आरोपांना उत्तर म्हणुन दिली आहेत, जी आरोप करत आहेत की लोकशाही चा तिसरा स्थंभ ढासळला !
मग या प्रकरणाच्या आधी दिलेल्या उदाहरण वरून तो तिसरा स्तंभ ढासळला का?
अश्या खुप न्यायव्यवस्थेतील व्यक्ती व प्रशासनातील अधिकारी आहेत जे सर्वोच्च पदावरून निवृत्त होऊन विविध आयोग , राज्यपाल पद व राजकारणात येऊन काम केले आहे. तेव्हा न्यायव्यवस्था ही खुप चांगली होती आणि ती वाईट झाली का?. प्रत्येक न्यायाधीश हे त्यांच्या समोर असलेल्या पुराव्यांवरून निर्णय देतात. हा निर्णय कोणाच्या तरी बाजूने किंवा विरूद्ध ही लागतो.
माननीय रंजन गोगोई यांच्या विरुद्ध आरोप केला की त्यांनी खालील विषयात त्यांनी भाजपा च्या बाजुने निर्णय दिला.
१) अयोध्या खटला – हा खटला सुमारे ७० वर्षे न्यायव्यवस्थेत अडकऊन राहिलेला होता. त्या खटल्याचा निकाल रंजन गोगोई यांनी दिला. जेव्हा हा निकाल माननीय रंजन गोगोई यांनी दिला तेव्हा सर्व राजकीय पक्ष व अनेक मान्यवर लोकांनी विशेष म्हणजे ज्या पक्षकारांविरूद्ध हा खटला होता त्यांनीही आनंदाने हा निकाल स्विकारला ,याच स्वागत केलं. खर तर हा निकाल ७० वर्षे वेगवेगळ्या न्यायाधीशांच्या कोर्टात चालुन, वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून दिला होता. तेव्हा भाजपा विरूद्ध नेते मंडळी व अन्य व्यक्तींनी असं सांगितलं की हा निकाल म्हणजे भाजपा ला धक्का!. हा निकाल म्हणजे भाजपा च्या राजकारणाला स्थगिती. एवढेच काय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उध्दव ठाकरे यांनी या महिन्यातील अयोध्या दौर्यावेळी असं म्हटलं की राम मंदिर हे शिवसेनेच्या कष्टाचं फळ आहे! भाजपा मुळे झालं नाही.😅 आणि त्याच सरकार मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी हे सामील आहेत. मग हा खटला टेक्निकली भाजपा च्या बाजुने कसा? याच उत्तर हे लोक देऊ शकतील का?
२) राफेल विमान खटला- या खटल्यामध्ये काँगेस पक्षाने मोदी सरकार विरूद्ध राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा केला म्हणुन त्याविरोधात खटला दाखल केला होता. विशेष म्हणजे न्यायालयाने सक्षम पुराव्याअभावी जवळपास सव्वा वर्षाच्या कारवाईनंतर १४ नोव्हेंबर २०१९ रोजी अनेक पुनर्विचार याचिका ऐकून हा खटला फेटाळला. जर विरोधी पक्षांना वाटतं असेल तर ते अजुन एकदा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात.
तसेच रंजन गोगोई यांच्या वर अजुन एक आरोप केला जातोय की त्यांच्या विरूद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. मित्रांनो मी तुम्हाला सांगु इच्छितो की या खटल्याचा निकाल सध्याचे न्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतखालील अन्य २ महिला न्यायाधीश यांच्या खंडपीठाने खटला चालवऊन माननीय रंजन गोगोई यांना दोषमुक्त केलं आहे. या प्रकरणाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत गोगोई यांचा समावेश नव्हता.
वरील प्रकरणात अजुनही कोणाला शंका असल्यास ते सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरणे घेऊन जाऊ शकतात. हे काम कोणी करेल का?
अरे टीकाकारांनो रंजन गोगोई हे पूर्णपणे काँग्रेस विचारसरणीच्या परिवारातुन आलेले आहेत. त्यांचे वडील हे केशब चंद्र गोगोई हे काँग्रेस कडून आसाम चे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे ते आयुष्यभर काँगेस शी एकनिष्ठ राहिले. तुमच्या नेत्यांसारख त्यांनी पक्ष नाही बदलला.
रंजन गोगोई यांचा तत्कालीन मुख्य न्यायाधीश व केंद्र सरकार यांच्या विरुद्ध उठाव –
हेच ते रंजन गोगोई आहेत ज्यांनी २०१८ ला ५ न्यायाधीश सोबत घेऊन तत्कालीन मुख्य न्यायाधीश व केंद्र सरकार विरुद्ध आवाज उठविला होता, तेव्हा ते चांगले आणि आता ते वाईट. त्यावेळी सर्व मोदी व भाजपा विरोधी पक्ष व व्यक्तींनी गोगोई यांना एक हीरो म्हणुन प्रसिद्ध केले होते. म्हणजे हे असं झालं अरविंद केजरीवाल यांनी कनैया कुमार विरूद्ध देशद्रोहाचा खटला चालविण्याची परवानगी देण्याआधी ते खुप चांगले होते आणि नंतर ते गद्दार😅.
न्यायव्यवस्था च्या सर्वोच्च पदावरून निवृत्त होऊन कोणतेही पद स्वीकारणे अथवा कोणत्याही पक्षात प्रवेश करणे यावरून दोन मतप्रवाह असु शकतात. पण मी या मताचा आहे की त्यांनी ती घ्यावीत अथवा राजकारणात ही प्रवेश करावा. जर काही तथाकथित संविधान रक्षक यांना हे अयोग्य वाटतं असेल तर त्यांना मी सांगु इच्छितो की यावर बंदी घालण्यासाठी आपल्या बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात बहुमताने बदल करावा लागेल. ही माहिती सगळीकडे पसरावी , म्हणजे सामान्य माणसाला हेही लक्षात येईल की संविधान बदलायची मागणी कोण करत आहे😅😅😅.
मित्रांनो रंजन गोगोई यांना राष्ट्रपतींनी राज्यसभा सदस्य म्हणुन नेमणुक केले म्हणजे ते आता भाजपा चे सदस्य झाले असे नाही. सध्या राज्यसभेत मेरी कोम व प्रख्यात अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणुन काम करत आहेत जे कोणत्याही पक्षाचे नाहीत. रंजन गोगोई हेही याचप्रमाणे काम करतील. व आपल्या राज्यसभेची प्रतिष्ठा वाढवतील.

-By Saurav Patil

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *