Youngster’s Drugs Addiction | तरूणाई व्यसनाच्या विळख्यात

Addiction of youngsters towards drugs

व्यसन आता काही नवीन राहिलं नाही. गल्लोगल्ली आणि पावलोपावली तलफ पुरविणारी दुकाने, टपऱ्या दिमखात दिसतात. एकेकाळी पालकापासून मुले लपवून असायची पण आता तसे राहिलेले नाही. खुलेआम सिगारेटचा धूर सोडणारी मुले दिसतात. “धुम्रपान सेहत के लिए हानिकारक है” असे असले तरी त्याची प्रियता वाढलेली आहे. धुम्रपान असो, अंमली पदार्थांचे सेवन असो, मद्यपान असो आता ती स्टाईल बनली आहे. मुली सुध्दा आता अपवाद नाही. मुंबई, पुणे बरोबर आता इतरही शहरांत मुली सुध्दा सिगारेटचा धुर सोडताना दिसतात. त्यात त्यांनाही पुरूषार्थ वाटू लागला आहे. त्यांना ही मोकळी म्हणजे स्री स्वातंत्र्य हा भाबटा विश्वास वाटू लागला आहे. कॉलेजच्या मुले-मुलींपासून आता शाळेतील आठवी ते दहावीची मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहेत.


देशाचं उज्वल भवितव्य म्हणून ज्या तरूणाईकडे पाहिले जाते. त्याची संख्या ५०-५५ टक्के पेक्षा जास्त आहे. हीच तरूणाई बेरोजगारी-बेकारी बरोबरच निराशेमुळे व्यसनाच्या आहारी गेल्याचे पावलोपावली निदर्शनास येत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुलांमध्ये तंबाखू, सिगारेट, गुटखा, विमल, मावा यांचे व्यसन गंभीर पातळीवर पोहोचले आहे. भोगवादी अन् चंगळवादी वृत्तीमुळे माणूस ज्या आहारी जात आहे ते एक दिवस आयुष्य संपविणार आहे, याचे भानही त्याला राहिलेले नाही. अशी अस्वस्थता समाजात दिसत आहे. मध्यमवर्गाच्या ‘पाँश’ राहणीच्या मोहिनीत भल्याबुऱ्या मार्गाने पैसा कमवून सिगारेट-दारूच्या धुंदीतल्या ‘हाँप्पी लाईफ’ च्या जाऴ्यात तरूण-तरूणी ओढले जात असताना सगळे आलबेल असल्यासारखे पहात आहेत. जेव्हा चौदा पंधरा वर्षाशी पोरं जेव्हा दारूच्या आहारी जातात तर काय असणार यांचे भवितव्य? सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगविण्यात याच व्यसनींचा मोठा वाटा आहे. गलिच्छपणाचा कळस गाठलेला असताना नागरिक म्हणून आपणही गप्पच आहोत.


तंबाखूजन्य पदार्थाचा विचार केला तर त्यामध्ये ४८०० प्रकारची रसायने असतात;.त्यामध्ये ६९ रसायने ही कॅन्सर होण्यास पोषक आहे. सिगारेटमध्ये ४००० रसायने असतात, त्यापैकी ४३ रसायने कॅन्सर होण्यास कारणीभूत आहेत. तंबाखूजन्य पदार्थामध्ये निकोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच कार्बन मोनाँक्साईड, हायड्रोजन सायनाईड, अरसेनिक, डीडीटी, अमोनिया, फाँर्मलडिहाईट यांसारखे घातक घटक असतात की जे कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात. कॅन्सरचे वेगवेगळे रूप डोऴ्यासमोर येत आहे. त्यामध्ये मेंदू कॅन्सर, फुफ्फुस कॅन्सर, हाडांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर हे प्रकार आहेत. तरीही माणूस याचा विचार करताना दिसत नाही. तरूणाई जर अशाप्रकारे स्वयंघोषित विनाशाकडे वाटचाल करत आहेत, हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे.


महाविद्यालय परिसरात गप्पा करत बसणे, बसस्थानकावर अनपेक्षित उनाडक्या करत बसणे, थर्टी फस्ट आणि इतर पार्टींतून तरूण पिढी विळख्यात अडकली जात आहे. पालक नोकरी आणि व्यवसायामध्ये ऐवढे गुंतले आहेत की त्याला आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यासही वेळ नाही. मुलांशी संवाद होणे गरजेचे आहे. त्यांचे दु:ख, भावना, शारीरिक बदल, अडचणी समजून घेण्याची गरज आहे. ते बोलत नसतील बोलते केले पाहिजे. त्याच्या मित्रांबद्दल विचारले पाहिजे. बऱ्याच वेळा आई-वडिलांना मुलांंचे मित्र-मैत्रीण माहित नसतात. मित्राच्या वाईट सवयीचा एकमेकांवर परिणाम होत असतो आणि त्यातून तो त्या विळख्यात अडकला जातो. त्यासाठी पालकांच्या जागृकतेची गरज आहे. कारण “जी संपवतच नाही तर जाळून खाक करते, ती नशा…! मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, ती त्यांना निभाववीच लागेल!

-By नवनाथ मोरे

Share

One thought on “Youngster’s Drugs Addiction | तरूणाई व्यसनाच्या विळख्यात

  • March 18, 2020 at 5:53 pm
    Permalink

    It’s a real fact in now a days so we are trying for minimize it

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *