राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा का केलाय एवढा व्याप .?

 बेकायदेशीर रित्या देश सीमा ओलांडून तिथल्या स्थायिक नागरिकांच्या हक्काची जमीन ,पैसा व रोजगार चोरणे हि समस्या जगातील सर्व देश तोंड देत आहेत. सर्वाधिक परिणाम दर्शवणाऱ्या सीमा म्हणजे  अमेरिका – मेक्सिको , भारत – पाकिस्तान , भारत – बांगलादेश.

अमेरिका ने मेक्सिको मधून येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरित लोकांना शस्त्रधारी पोलिसाचा सामना करण्यास भाग पाडले आहे, जिथे फक्त “मागे फिरा नाहीतर आम्ही शास्त्राचा वापर करू” असे थेट पर्याय दिलेले असतात. भारत हा देश मर्यादापुरषोत्तमाच्या संस्कृतीचा. “अतिथी देवो भव”,” वसुधैव कुटुंबकम ” अशा सूत्रांचे आचरण करणारा देश. कोणी घरी आल्यास पाणी व गुळखडा देऊन स्वागत करायची पद्धत..  पण आज तोच पाहुणा आपले घर बळकावू पाहत आहे व मुजोरी सहित घरावरती हक्क सांगत आहे. बेकायदेशीररित्या  देशांतर केलेले बांगलादेशी बेळगाव पर्यंत तर पाकिस्तानी काश्मीर पर्यंत स्वतःचा बाड – बिस्तारा उघडून बसले आहेत. देश आज राजनैतिक स्थिरावता प्राप्त करण्याच्या वाटेवर असताना ह्याच विशिष्ठ बेकायदेशीर स्थलांतरित लोकांचा वापर करून असंतुलता माजवण्यात येत आहे. देशातील मागासलेल्या आपल्या बंधू – भगिनींचा हक्क देखील हे मारत आहेत .

                              देशातील सर्व सुविधा व शिष्यवृती प्राप्त करण्यासाठी एकाच मुख्य ओळखपत्र ग्राह्य आहे ते म्हणजे आधारकार्ड . हे आधारकार्ड बांगलादेशी लोकांना सीमा ओलांडून आल्यानंतर केवळ ४०० रुपयात मिळते. ह्याचे पुरावे म्हणजे परदेशातील youtubers नि भारत – बांगलादेश सीमेवर जाऊन बनवलेल्या चित्रफिती. ज्या आजहि ऑनलाईन उपस्थित आहेत.

               जे सरकारी पैसे ,ताकत व लक्ष माझ्या गरीब मागासवर्गीय – सर्वजातीय विकासासाठी उपलब्ध हवा तो ह्या बेकायदेशीर स्थलांतरित लोकांच्या वाट्यास येतो.मदत देण्यास आपले महान राष्ट्र कधीच मागे राहिले नाही . पण आपलीच मदत घेऊन आपल्यावरच दाब – मुजोरी कारण्यारची हक्कलपट्टी हि असावीच. ती हकालपट्टी कायदेशीर असावी ह्यासाठी आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा.

सोळाशें च्या काळात “आम्ही गरीब समुद्री व्यापारी आहोत आम्हाला काही दिवसाचा आश्रय द्यावा” अशी ओळख करून देणाऱ्या लबाडी ब्रिटिशांची आज आठवण होते. त्याकाळात परकीय मुजोरीला हणून पडून पळवून लावणारे महादेवाचे अवतार छत्रपती शिवाजी महाराज होते. आज अशा परकीय मुजोरीला पळवून लावणारी ताकत म्हणजे बाबासाहेबांचे आशीर्वाद म्हणजे संविधान आहे. कायदे व व्यवस्था संविधाना नुसारच चालावी ह्या साठी हा कायदा.

               आपल्याला मिळालेली माती हि आपल्या राजाच्या सर्वतोपरी आहुतीची देणं आहे.  स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीर आत्म्याच्या पुण्याईची देणंआहे. भारतीय सशस्त्र सेनेच्या वीरतेची ओळख आहे. आई भवानीच्या अवताराची आऊ साहेबांच्या आशीर्वादाची देणं आहे. ह्याच त्या  मातीचा आदर व प्रतिष्ठा कोणीही परकीय यावा व पुसून जावा हे पुन्हा शक्य होऊ नये म्हणून हा कायदा.                                                                              आपल्या ह्या महान राष्ट्रात लपून बसलेले परकीय गनीम व फितूर टिपून  काढण्या साठी ,त्यांना पळवून लावण्या साठीच हा राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा.  जय हिंद

हिमालयं समारभ्य यावत् इंदु सरेावरम् |

तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते ||

-By Shivam Kagalkar

Share

8 thoughts on “राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा का केलाय एवढा व्याप .?

 • January 27, 2020 at 9:31 pm
  Permalink

  jai hind

  Reply
 • January 27, 2020 at 9:36 pm
  Permalink

  Bhai bhai … jai bhawani

  Reply
 • March 29, 2020 at 6:42 pm
  Permalink

  Great looking site. Assume you did a great deal of your very own coding.

  Reply
 • May 5, 2020 at 3:38 am
  Permalink

  whoah this blog is great i love reading your posts.

  Keep up the great work! You know, a lot of people are searching
  around for this info, you can aid them greatly.

  Reply
 • May 31, 2020 at 10:18 pm
  Permalink

  Excellent post! We will be linking to this particularly great post on our
  site. Keep up the great writing.

  Reply
 • June 1, 2020 at 6:18 pm
  Permalink

  Hey! This is my 1st comment here so I just wanted to give a quick shout out and say I really enjoy reading through your posts. Can you recommend any other blogs/websites/forums that deal with the same subjects? Thanks!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *