Israel Moon Mission : इस्राईलने पाठवले भारताच्या आधी चांद्रयान ? | Part 1

Small Country, Big Dreams

Israel moon mission launching of beresheet using falcon of spacex. This covers story of spaceIL company participating in google lunar xprize competition

ज्यावेळी आपण चांद्रयान 2 च्या तयारीत गुंतलो होतो, तेव्हा इस्राईलने चंद्रावर जाण्यासाठी कंबर कसली होती. तारीख 11 एप्रिल 2019 रोजी इस्राईल त्यांच्या चांद्रयान बेअरशीट सोबत चंद्रावर उतरणार होते. “small country,  big dreams” हे तेच वाक्य आहेत जे इस्राईलचे यान बेअरशीट त्याच्या सोबत घेऊन गेले होते.
गोष्ट चालू होते 2011 पासून, जेव्हा गुगल लुणार एक्सप्राइझ स्पर्धा जिंकण्यासाठी इस्रायलमध्ये  SpaceIL नामक कंपनीची स्थापना होते. गुगल लुणार एक्सप्राइझ जिंकण्यासाठी  SpaceIL ला एक अशी रॉकेट प्रणाली निर्माण करण्याची होती, जी सर्वात कमी खर्चात डिझाईन, निर्माण, लॉन्च आणि लँड व्हायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये पाच स्पर्धक सहभागी होते आणि यामध्ये एक भारताची टीम “टीम इंडस” देखील शामिल होती.
SpaceIL ची योजना एकदम नवीन होती. साधारण चाकांच्या रोवर चा वापर न करता दुसऱ्या पर्याय शोधण्याची. चाकांच्या रोव्हर मुळे चंद्राच्या मातीमध्ये अडकून बसण्याची समस्या निर्माण झाली असती. याला उत्तर म्हणून  SpaceIL ची योजना होती की जम्प रोवर निर्माण करण्याची, जे रोवर रॉकेट इंजिन प्रॉपुलशन चा वापर करून उड्या मारत अंतर पार करेल. त्यांच साधारण लक्ष होतं 500 किलोमीटरचा टप्पा गाठण्याच.

 आर्थिक जमवाजमव 

या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी  SpaceIL ला खूप आर्थिक निधीची गरज होती. या नवीन कल्पने साठी गुगलने 20 मिलियन डॉलरची मदत दिली. स्पर्धेमध्ये सगळ्यात पुढे राहण्यासाठी 5 मिलियन आणि विशेष उपलब्धतेसाठी 5 मिलियन असे मिळून 30 मिलियन युएस डॉलरची मदत देऊ केली. इसवी सन 2013 मध्ये इसराइल स्पेस एजन्सीने 5.5 लाख डॉलर आणि 2017 मध्ये 20 लाख अमेरिकन डॉलर अशी 25.5 लाख अमेरिकन डॉलर रुपयांची मदत देऊ केली. पण ही रक्कम स्पेस-आयल च्या आणि इस्राईलच्या उद्दिष्टासाठी पुरेशी नव्हती म्हणून अमेरिकी व्यापारी शाल दोन यांनी 16.4 मिलियन डॉलरची अतिरिक्त मदत देऊ केली.
गुगलने या स्पर्धेसाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2017 अशी घोषित केली. मात्र एक महिना आधी 2017 मध्ये, SpaceIL ने 30 मिलीयन डॉलर्स मुदत आणखी लागणार असल्याचे जाहीर केले. फक्त एक महिन्याचा कालावधी राहिला होता, इस्रायल साठी हा परीक्षेचा काळ होता. पण यावेळी इस्रायलचे सामान्य नागरिक एकत्र आले आपल्या देशाला सावरण्यासाठी, नवीन भविष्य बनवण्यासाठी व सर्वांना मिळून 30 मिलियन डॉलरची SpaceIL ला मदत केली.
आता मात्र हे मिशन फक्त एक मिशन राहिले नव्हते. यामागे लाखो इस्रायली लोकांच्या भावना, आशा पनाला लागल्या होत्या. तसेच कोणतेही सरकारी संघटन यामध्ये थेट हस्तक्षेप न केल्यामुळे हे एक private मिशन देखील संबोधले जात होते. सर्व लोकांच्या  हौसल्यांना सोबत घेऊन रॉकेट उडणार होते, म्हणून स्पेस आयने याचं नाव स्पॅरो ठेवले.

 स्पर्धा बंद ? पुढे काय ? 

पण अद्यापही कोणतीही टीम लॉन्च करू न शकल्यामुळे गुगलने मुदत वाढवून 31 मार्च 2018 केली. तरीसुद्धा दिलेल्या कालावधीत कोणतीही टीम लॉन्च करू शकले नाही म्हणून गुगलने ही स्पर्धा बिना निकालाची बंद केली…..!
जिंकण्याच्या एवढ्या जवळ आले असताना माघार जाणे इस्राईलला पटले नाही व SpaceIL ने त्यांचे मिशन स्पर्धेनंतर ही सुरू ठेवले. टीम इंडस्ट्ने देखील आपले काम सुरूच ठेवले आहे. त्यांच्यातील सामर्थ्याला पाहून गुगलने ही स्पर्धा no cash स्पर्धे प्रमाणे सुरू राहील असे जाहीर केले.

इसराइल त्यांच्या धोरणामध्ये सफल झाले का, बेअरशीट चे पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा…… भाग 2

-By Rushikesh Potdar
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *