Israel Moon mission : इस्राईलचे चांद्रयान चंद्रावर उतरले का? | Part 2

इस्राईलचे चंद्रयान बेअरशीट यशस्वी झाले का ? या गोष्टीची कल्पना कुणालाच कशी नव्हती ?

Israel moon mission launching of spaceIL beresheet using falcon of spacex. This covers story of landing of beresheet on moon at 11 april
भाग १ पासुन पुढे…

सर्वांना सोबत घेऊन पूर्ण तयारीने इस्रायलचे रॉकेट उंच भरारी घेण्यासाठी तयार होते. मिशन होते ते रॉकेटला चंद्रावर उतरून तिथल्या चुंबकीय लहरींचा अभ्यास करणे. स्पॅरो रॉकेट त्याच्यासोबत फक्त दोनच यंत्र घेऊन जाणार होते. पहिले यंत्र होतं मॅग्नेटोओ मीटर, जे चुंबकीय लहरींचा अभ्यास करणार होते. तर दुसरे यंत्र पृथ्वी ते चंद्र मधील अंतर मापणार होते. मॅग्नेेटोओ मीटर हे यंत्र इस्राईल मध्येच एका इन्स्टिट्यूटने तयार केले होते तर दुसरे यंत्र नासाने दिले होते.

यासोबतच हे रॉकेट घेऊन जाणार होतं टाइम कॅप्सूल. टाइम कॅप्सूल हे तीन करोड पानांचं एक डिस्क होतं. ज्यामध्ये मानव व पृथ्वी बद्दलची संबंधित माहिती होती. त्याचबरोबर बायबलचे पहिले पाच पुस्तक, सर्व भाषांचे मिश्रण असलेले साहित्य, स्पेस आणि दुनिया बद्दलची लहानांची चित्रे, इस्रायलचे राष्ट्रगीत, झेंडा हेदेखील टाइम कॅप्सूल मध्येच सामील होते.
या सर्व वरूनच दिसते कि मिशन स्पॅरो हे फक्त मिशन राहिले नसून सर्वांच्या भावना यामध्ये होत्या. बहुदा याच कारणावरून स्पॅरो हे नाव बदलून बेअरशीट असे नाव रॉकेटला देण्यात आले. हा मूळचा हिब्रू भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ सुरुवात असा होतो.
हे मिशन इस्राईलला नवी दिशा देणारे होते, हे मिशन इस्रायलला गौरव प्राप्त करून देणारे होते. इस्रायली लोकांचा गौरव वाढवणारे होते, युवकांमध्ये नवीन ऊर्जा मिळवले होते. इस्रायली वैज्ञानिकांचा दावा आहे की मिशनच्या आधी सर्व वैज्ञानिकांनी एक मिलियन विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन, त्यांना मिशन बद्दल अंतराळातील विश्वाबद्दल माहिती दिली होती.

 बेअरशीटची अवकाशात भरारी 

याआधी फक्त तीनच देश अमेरिका रशिया आणि चायना चंद्रावर पोहोचले होते जर हे मिशन सक्सेसफुल झालं असतं तर इस्राईल असे करणारा चौथा देश पडणार होता या प्रकल्पासाठी दोनशे जणांची टीम कार्यरत होती त्यामधील 95 टक्के लोक हे स्वयंसेवक होते
जानेवारी 2019 रोजी सर्व चाचण्या पूर्ण करून इस्राईल रॉकेट चंद्रावर जाण्याच्या तयारीत होते. उड्डान करण्यासाठी रॉकेटला कॅनडामध्ये घेऊन जाण्यात आले व 22 फेब्रुवारी रोजी १ वाजून 35 मिनिटांनी  UTC स्पेसएक्सच्या Falcon रॉकेट मधून याचे प्रक्षेपण झाले व हे रॉकेट चंद्रावर झेपवले.
24 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत बेयरशिटला अॉरबिट वाढवत वाढवत, एका जोरदार झटक्याने गुरुत्वाकर्षण रिंग पार करून चंद्राच्या दिशेने रवाना व्हायचे होते. जेणेकरून चंद्राजवळ पोहोचताच चंद्राचे गुरुत्वाकर्षण शक्ती उपग्रहाला पकडून ठेवेल. हे दिसायला जरी सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र अनेक अडचणी आल्या. उड्डाणानंतर लगेचच स्टार्ट ट्रॅक्टर यंत्र सोलार रेडिएशनमुळे बंद पडले व मध्यंतरी स्पेसक्राफ्ट चा कॉम्प्युटर काम करेनासा झाला. पण हे प्रॉब्लेम्स लगेच सोडण्यात आले.

 चंद्रावर लँडींगची वेळ 

४ एप्रिलचा दिवस उजाडला. यान चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. आता फक्त काम बाकी राहिले होते ते म्हणजे गती कमी करून ऑर्बिट ला सर्क्युलर करणे आणि 11 एप्रिल 2019 रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचे ठरवले होते.
तर दुसरीकडे जर बेअरशीट उद्दिष्टांमध्ये विजयी झाले तर गुगल त्यांना १ मिलीयन डॉलर्स इनाम देईल असे गुगल कडून जाहीर करण्यात आले. या आवडला मून शॉट अवॉर्ड असे नाव देण्यात आले.
11 एप्रिलचा दिवस उजाडला. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या मिशनचा फक्त काही भाग शिल्लक राहिला होता. लाईव्ह लँडिंग पाहण्यासाठी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन स्पेस आयएलच्या कंट्रोल रूम मध्ये दाखल झाले होते. चंद्रा पासूनच अंतर किलोमीटरवरून काही मीटर राहिले असताना ब्रेकिंग प्रक्रिया सुरुवात झाली. पण चंद्राच्या फक्त 149 मीटर अंतरावर असताना यानाचे मेन इंजन बंद पडले. कंट्रोल रूम शी यानाचा संपर्क तुटला.
134 मीटर प्रती सेकंद या वेगाने यान चंद्रावर कोसळत होते. सर्वांची ह्रुदये देखील याच वेगाने पळत होती. सुदैवाने यंत्रणा पुन्हा चालू करण्यात शास्त्रज्ञांना यश आले परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. यान एवढ्या वेगाने कोसळत होते की यानाचा वेग एवढ्या कमी वेळात कमी करणे अशक्य होते. मृत्यू स्वतःच्या डोळ्यादेखत बघावा अशी स्थिती सर्वसामान्यांची झाली होती. अवघ्या काही सेकंदातच यान चंद्रावर जमीनदोस्त झाले. वेळ होते 19. 25 UTC कंट्रोल रूमने मिशन फेल असे जाहीर केले.
जरी हे मिशन सफल झाले असते तरीदेखील याचा कालावधी फक्त दोनच दिवसांचा असता. कारण वातावरण नियंत्रणासाठी यामध्ये काहीही सोय करण्यात आलेली नव्हती. दोन दिवसानंतरच तापमान वाढीमुळे हे यान बंद पडले असते.
इसराइल जरी या मिशनमध्ये असफल झाले तरी त्यांनी करोडो लोकांची ह्रुदय व विश्वास जिंकला. गुगलने ही त्यांच्या कार्याला पुरस्कृत करण्यासाठी कशा पद्धतीने का होईना पण बेअरशीट चंद्रावर पोहोचले म्हणून गुगलने इस्त्राईललात्र मून शॉट अवॉर्डने सन्मानित केले. यावेळी उपस्थित असलेले बेंजामिन म्हणाले, “जरी आपण पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलो तरी पुन्हा प्रयत्न करू पण उद्दिष्ट आवश्यक गाठु”. यातूनच प्रेरणा घेऊन इस्राईलचे लोक पुन्हा नव्या जोमाने बेडशीट मून मिशन –  II च्या कार्याला लागलेत.
जरी 10 एप्रिल च्या ब्लॅक होल च्या पहिल्या छायाचित्रांमुळे जगाचे या गोष्टीकडे लक्ष गेले नाही, तरी आपण इस्रायलकडून शिकलं पाहिजे. आकाराने जरी आपण लहान असलो, शक्तीने जरी आपण कमी असलो तरी दृढ संकल्पाने आपण काहीही साध्य करू शकतो. अगदी पृथ्वीबाहेरील चंद्राला पण स्पर्श करू शकतो….! 

-By Rushikesh Potdar
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *