India invites Pakistan | भारत देणार पाकिस्तानला आमंत्रण….!

शांघाय सहकार्य संघटनेची देशाच्या प्रमुखांची प्रथमच बैठक भारतात होत आहे

india invites pakistan for shanghai cooperation organisation including various nations

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना शांघाय सहकार्य परिषदेच्या वार्षिक बैठकीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


शांघाय सहकार्य परिषदेच्या शिष्टाचार आणि प्रथेनुसार सर्व आठ सदस्यांना त्याचबरोबर चार निरीक्षण देशांना तसेच आंतरराष्ट्रीय संवाद सहयोगी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केली आहे.


मग आता पाहूया पाकिस्तान हे आमंत्रण स्वीकारते का नाही…

काय आहे शांघाय सहकार्य परिषद?

 • शांघाय सहकार्य परिषदेची स्थापना 15 जून 2001 रोजी बीजिंग(चीन) मध्ये झाली.
 • ही संघटना विभागीय सुरक्षा राखणे आणि सुरक्षेला बळकटी देणे तसेच दहशतवादविरोधी सहकार्य हेतूवर काम करत आहे.
 • सदस्य = चीन, भारत, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया,ताजिकिस्तान,उझबेकिस्तान,पाकिस्तान
 • 9 जून 2017 रोजी भारत आणि पाकिस्तान यांना सदस्य पद देण्यात आले.
 • या परिषदेवर चीनचे वर्चस्व आहे.तसेच या संघटनेला ‘पूर्वेकडील आघाडी’ असेही म्हणतात.

by Akshay Patil

To read more from Akshay, Click Here

Share

One thought on “India invites Pakistan | भारत देणार पाकिस्तानला आमंत्रण….!

 • June 4, 2020 at 6:17 pm
  Permalink

  Thanks so much for the post.Much thanks again. Really Cool.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *