इंजिनिअर्स आणि बेरोजगारीचं जुळून आलेल नातं

भारत देश सध्या कुठल्या मोठ्या संकटाला सामोरे जात असेल तर ते आहे बेरोजगारीचं आणि बेरोजगारी चा विषय जिथे निघतो तिथे पहिले नाव असतं ते इंजिनिअर्सच (अभियंता). जो इंजिनिअर लोकांच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी ओळखला जातो आज तोच इंजिनिअर स्वतःच्या बेरोजगारीच्या प्रश्नांनचे उत्तर शोधतोय. म्हणूनच कदाचित इंजिनिअर हा सध्या सर्वांसाठी आवडीचा चर्चेचा विषय बनलेला आहे. ज्या क्षणाला तुम्ही इंजिनिअर असल्याचा परिचय समोरच्या व्यक्तीला दिला त्याच्या दुसर्‍याच क्षणाला प्रश्नांचा तोफमारा सुरू झाला असं समजा. प्रश्न असतात ते पास झालेल्या असंख्य इंजिनिअर्स बद्दलचे, कमकुवत शिक्षण प्रणालीचे आणि त्यामुळे उद्भवलेल्या बेरोजगारीचे.

इंजिनीअर पदवी मिळवण्यासाठी पहिलं वर्ष ते शेवटचं वर्ष असा साफ दिसणारा मार्ग, पदवीधर म्हणून महाविद्यालयाच्या बाहेर पडताच, पुढे काय ? ह्या प्रश्नाने अंधुक व खडतर दिसायला लागतो. मी स्वतः इंजिनीअर असल्यामुळे सध्याच्या कठीण परिस्तिथी ची जाण मला चांगल्या प्रकारे आहे आणि ही परिस्थिती कोण कोणत्या कारणाने उद्भवली हे लक्षात येण्यास मला वेळ देखील लागला नाही. प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण होऊन जेव्हा आपण कंपनी मध्ये काम करण्यास रुजू होतो तेव्हा आपण करत असलेल्या कामात आणि घेतलेल्या शिक्षणात काय फरक आहे हे जाणवायला सुरुवात होते. तो फरक फक्त एका गोष्टीमुळे निर्माण झालेला असतो ते म्हणजे महाविद्यालयात आपल्याकडून पुस्तकी ज्ञान मिळवण्या करीता दिला गेलेला नव्वद टक्के भर आणि फक्त दहा टक्के भर हे जाणण्याकरिता की कंपनी मध्ये वापरात असलेल्या तांत्रिक गोष्टी प्रत्येक्षात कशाप्रकारे हाताळले गेले पाहिजेत. 

पूर्वी योध्यांना आणि राजांना सुद्धा शास्त्र आणि शस्त्र दोन्ही च समान ज्ञान दिलं जायचं. फक्त शास्त्र किंवा फक्त शस्त्रांचे ज्ञान घेऊन युद्ध जिंकता येत नाहीत हे त्यांना हजारो वर्षांपूर्वीच कळालं होतं. पण आपल्या प्रशासनाला ही गोष्ट कळण्यास इतका उशीर का लागतोय ? त्यांना ही गोष्ट कळाली असती तर विद्यार्थ्यांनी वर्षभर रद्दी लिहण्यात वेळ घालवला नसता, त्यांना ही गोष्ट कळाली असती तर सध्या इंडस्ट्रीज मध्ये वापरात असलेलं आणि भविष्याच्या दृष्टीकोणाने अति महत्वाचं असलेलं ऑटोमेशन व रोबोटिक्स वर प्रत्येक विद्यापीठांमध्ये विध्यार्थी प्रात्यक्षिके करताना दिसले असते. मग इथे दोष कोणाचा पाठ्यक्रमाचा का विद्यार्थ्यांचा ?

पण आपण ह्या विषयांवर किती जरी चर्चा केली तरी होणार काय? शेवटी ह्या समस्यांचं समाधान करण्यासाठी तर सरकारलाच ठोस पाऊल उचलावी लागणार आणि मी तर म्हणतो हे काम जेवढ लवकर केलं गेलं तेवढंच चांगलं. कारण इंग्रजी मध्ये एक म्हण आहे ” A stitch in time saves nine “. बऱ्याच वेळेला काही गोष्टींना महत्व न दिल्याने किंवा त्या गोष्टी गंभीर्याने न घेतल्याने त्याचे परिणाम भविष्यात दिसून येतात. म्हणूनच सरकारने इंजिनिअर्स बद्दलच्या प्रश्नांना आता तरी गंभीरतेने घेयला हवं, कारण आता गंभीरतेने घेतलं नाही तर भविष्यात परिस्तिथी अजून विकट होत जाणार.

अस पण म्हणणे चुकीचे आहे की सरकारच बेरोजगारीच्या विषया कडे लक्ष नाही. दरम्यानच्या काही वर्षात ज्या प्रकारे विदेशी निवेश वर भर देण्यात आलाय त्याने नक्कीच रोजगाराला मदद मिळेल पण यामुळे वाढत असलेले बेरोजगार थांबणार नाहीत. मागच्या काही वर्षात ज्या प्रकारे इतक्या असंख्य कॉलेजेस ला (महाविद्यालयांना) परवानगी देण्यात आली त्यावरून अस तर बिलकुल जाणवत नाही की त्या वेळेस च्या सरकारने उपलब्ध असलेल्या औद्योगिक नौकऱ्या आणि शिकत असलेले इंजिनिअर्स (किंवा पदवीधर) यांच आकलन केल असेल. त्यांनी राज्यातील उद्योग, नौकऱ्या आणि विद्यार्थी यांचा गुणोत्तर काढला असता तर कदाचित आज इतके महाविद्यालय अस्तित्वात नसते. जे अस्तित्वात आहेत त्या पैकी बहुतांश महाविद्यालयांमध्ये तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण किंवा सशर्त इंजिनिअर्स बनतील असे पोषक वातावरण नसताना सुद्धा त्यांना मान्यता मिळाली. अखेर हे बहुतांश महाविद्यालय राजकारण्यांचे असल्यामुळे त्यांना मान्यता मिळते यात काही नवल नाही. पण हे असले महाविद्यालय बांधण्यामाघचा ह्या राजकारण्यांचा नेमका उद्दिष्ट काय? पैसा का शिक्षण? हेच कळत नाही.


-By लक्षदीप क्षत्रिय

Share

2 thoughts on “इंजिनिअर्स आणि बेरोजगारीचं जुळून आलेल नातं

  • January 27, 2020 at 10:34 pm
    Permalink

    खुपछान सत्य

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *