America Iran War : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात…?

अमेरिका-इराण अणु करार संपुष्टात. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सीरिया ला अचानक भेट

covers story of thirld world war in between america and iran groups including syria and russia as russian president putin visits syria. Iran attacked on us?

 तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात…!चार दिवसांपुर्वी अमेरिकेने बगदाद येथे केलेल्या एअर स्ट्राइकने इराणचा     लष्कर अधिकारी कासिम सुलेमानी मारले गेले. तरी या एअर स्ट्राईक ची जबाबदारी अमेरिकेने घेतली आहे़. याचा परिणाम म्हणून अमेरिका आणि इराण परस्पर संबंध खुप ताणले गेले आहेत. हा आघात इतर राष्ट्रांनावरही पडत आहे़. 
     जेव्हा लष्कर अधिकारी कासिम सुलेमानी यांचे पार्थिव तेहरान मध्ये आणले तेव्हा त्यांचा अनुयायांची एकच गर्दी पाहायला मिळाली. इराणचे मुख्य नेता अयातोल्लाह खोमेनी यांनाही अश्रू अनावर झाले. तसेच इराणचे राष्ट्रपती हसन रोहानी यांनी अमेरिकेला चेतावनी दिली. सुलेमानी यांचे उत्तराधिकारी जनरल इस्माईल धानी यांनी बदला घेण्याचा संकल्प केला.
  दरम्यान अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी twitter द्वारे इराणवर हल्ला चढवला. ट्रम्प यांनी इराणच्या 52 स्थळांना निशाना साधून ती नष्ट करू अशी धमकी दिली आहे. यामध्ये इराणच्या धार्मिक स्थळाचा समावेश आहे. असे बोलण्यात आले आहे. जेणेकरून इराणच्या अस्मितेला धक्का लागेल.
अमेरिका- इराण अणुकरार संपष्टात
   तसेच अमेरिका-इराण मह्त्वाचा अणु करार संपुष्टतात आलेला आहे. पण या करारतअमेरिकेच्या बाजूने मागील वर्षी मे महिन्यात माघारी घेण्यात आली होती. आत्ता इराणने सुद्धा काडीमोड घेतला आहे़. या करारातून मुक्त होतच  इराणाने त्यांच्यावरील निर्बंध झुगारुन त्याचे यूरेनियम साठे वाढवायला सुरवात केली आहे, असे इराण कडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
या घडामोडिचा फटका भारताला बसण्यास सुरूवात झाली आहे. तरी पेट्रोल आणि डीजल दर वाढीने उच्चांक सर केला आहे़ आणि शेअर बाजार गडगढला आहे़. 

काय आहे़ अमेरिका-इराण अणु करार? 

– अमेरिकाचे तत्तकालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, फ्रान्स आणि जर्मनी (स्थायी सदस्य 5 + 1) यांना आपल्याबरोबर घेऊन इराण बरोबर अणु करार जुलै 2015 केला होता. 
– या करारानुसार इराण आपले यूरेनियम साठे कमी करून तसेच इराणचे अणु प्रकल्प देखरेख करण्यासाठी खुले कारणार होता. यांच्या बदल्यात इराणला आर्थिक मदत दिली जाणार होती.
व्लादिमीर पुतीन यांनी अचानक सीरिया भेट
 अमेरिका- इराण यांच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुतीन यांनी अचानकपणे सीरिया देशाला भेट दिली. सीरिया सरकार हे रशिया समर्थक सरकार म्हणुन ओळखले जाते. अमेरिका समर्थित इराक च्या सीमेला सीरिया देशाची सीमा लागुन असल्याने या भेटीला खुप महत्व आहे.
इराण ने घेतला कासिम सुलेमानी यांचा बदला
अमेरिकेने कासिम सुलेमानी यांच्या केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी इराण ने अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खुप अमेरिकन मृत्यु झाल्याची शक्यता आहे. या हल्ल्यात इराक मधील अल- असाद एअरबेस व ताजी बेस या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला.
याच पार्श्भूमीवर युक्रेन चे एक प्रवासी विमान इराण मध्ये क्रॅश झाले. यामध्ये १८० जणांचा मृत्यू झाला. या घटनेने अमेरिका, भारत तसेच अन्य देशांनी आपल्या विमानांचा या क्षेत्रातुन जाणारे मार्ग रद्द केले आहेत.

इराण- इराक हे शत्रु देश अमेरिके विरूद्ध एकत्र..!

पारंपरिक शत्रु असलेले इराण व इराक हे देश अमेरिके विरूद्ध एकत्र येण्याच्या शक्यता आहे. नुकतेच इराक संसदेने अमेरिका सरकार ला एक ठराव संमत करून पाठवला आहे. त्या मध्ये अमेरिकेने त्यांची लष्करी तळ बंद करावे.
या सर्व घटनांच्या संदर्भात जाणकार एक अंदाज लावत आहेत की तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात..तर झाली नाही ना?
-By Akshay Patil
To read more posts from akshay, click here
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *