एक जीवघेणा श्वास : वायू प्रदूषण

           देशातील ९४ प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वाधिक १७ शहरांचा समावेश आहे. प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असताना ही आकडेवारी महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंताजनक आहे. 

            देशातील ९४ प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वाधिक १७ शहरांचा समावेश आहे. प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असताना ही आकडेवारी महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंताजनक आहे. चंद्रपूरसारख्या शहरातील प्रदूषणाचा प्रश्न वर्षांनुवर्षे चर्चेत आहे. यावर उपाय योजण्याचे आश्वासन राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून दिले जाते. थातूरमातूर उपाय योजले जातात. त्यातून प्रश्न सुटत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तरीही प्रशासन फक्त उपाययोजना राबवत आहे असं दाखवत आहे. याचा बदल झालेला अजूनही दिसत नाही. 

          जगातील हिरव्या शहरांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणारे नागपूर शहर सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत आल्याने पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवींसह शहरातील नागरिकांनाही धक्का बसला. जागतिक आरोग्य संघटनेने काही वर्षांपूर्वी दिलेल्या या अहवालावर टीकेची झोड उठली, पण वास्तविकतेत शहरातील हिरवळ प्रदूषणाला रोखण्यासाठी पर्याप्त नाही. वाढती लोकसंख्या, त्यातून निर्माण होणारा घनकचरा, सांडपाणी, वाढती वाहनांची संख्या यामूळे शहर प्रदूषणाच्या खाईत लोटले गेले आहे

          विकासाच्या दिशेने शहर वाटचाल करत असले तरी सांडपाणी वाहून देण्यासाठी अजूनही जुन्याच मलवाहिन्यांचा वापर केला जात आहे. शहराची लोकसंखा ४० लाखांच्या घरात पोहोचल्यानंतरही जुन्याच मलवाहिन्या आहेत. अनेक ठिकाणी त्या फुटल्यामुळे सांडपाणी जमिनीत झिरपून मृदा प्रदूषणाच्या नवी समस्या उभी झाली आहे. शहरात दररोज ५०० एमएलडी सांडपाणी तयार होते. तर ११०० मेट्रीक टन कचरा दरवर्षी तयार होतो. त्यातील २०० मेट्रीक टन घनकचऱ्यावरच प्रक्रिया होत असल्याने उर्वरित घनकचऱ्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्याच्या विल्हेवाटीसाठी जे नवीन तंत्रज्ञान आणण्याच्या तयारीत महापालिका आहे, त्यातही अनेक त्रूटी आहेत. यात ओला आणि सुका कचरा तसेच प्लॅस्टिक वेगळे न केल्यास कचरा मार्गी लागण्याऐवजी प्रदूषणात वाढ होणार आहे.

      शहरातील झाडांच्या तुलनेत सिमेंटचे जंगल मोठे आहे आणि ते वाढतच आहे. गेल्या पाच वर्षांत शहरात साडेचार हजार झाडांवर कुर्हाड चालवण्यात आली. मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांकरिता वृक्षतोड सातत्त्याने सुरू आहे. शहरात सुमारे २९ लाख वृक्ष आणि प्रत्येक दहा व्यक्तीमागे नऊ वृक्ष आहेत. वास्तविकतेत प्रत्येक व्यक्तीमागे किमान तीन तर कमाल १७ झाडे असायला हवी. वाहनातून कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन मोनो ऑक्साईड हे प्रदूषण करणारे घटक बाहेर पडतात. रस्ते दुभाजकावर लावण्यात आलेली झाडे शोभीवंत असून, धुळ शोषून घेणारी आणि ऑक्सिजन निर्माण करणारी नाहीत. त्यामुळे शहरातील वाढत्या दुचाकी आणि चारचाकी वाहनातून निघणाऱ्या धुरांवर कोणतेही नियंत्रण नाही

       केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या हवेच्या परिक्षणानुसार हवेतील सल्फरडाय ऑक्साइडचे वार्षिक प्रमाण बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि मुंबईशी तुलना करता अधिकच आहे. श्वसनाला घातक असलेल्या धुलिकणांचे पुण्यातील प्रमाण प्रमाणित पातळीपेक्षा दोन पटीने जास्त आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येक वायूच्या उत्सर्जनाबद्दल मर्यादाही स्पष्ट केल्या आहेत. पण, सार्वजनिक वाहतूक सुधारण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे.

    एवढेच नव्हे तर, भारतात वायू प्रदूषणाने  १ लाख चिमुकल्यांचा बळी घेतला आहे. या विषारी वायूमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे, आणि कार्बनडॉय ओक्ससाईड चे प्रमाण वाढत आहे. या कारणामुळे पृथ्वी तलावावरील ओझोन चा तर कमी होत चालला आहे. 

    आज सगळ्यांनी सतर्क होऊन हे प्रदूषण कमी करण्याकडे जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे. नाहीतर पुढील येणाऱ्या पिढ्या ह्या कदाचित नष्ट च होईल. 

     याची लक्षणे सुरु होताना दिसतात. कारण वायू प्रदूषणामुळे ओझोन चा थर कमी होत चालला आहे. यामुळे सूर्याची किरणे थेट पृथ्वी तलावावर पडत आहे. हि किरणे अशुद्ध असल्यामुळे ती मानव जातीला हानिकारक आहे. आज विचार करणे गरजेचे आहे कि, वायू प्रदूषण रोखणे कस सोपं होईल, त्याची जबाबदारी कोणाकडे आहे ? त्यासाठी कोणी – कोणी प्रयत्न करायला हवेत, यासर्वांचा विचार करणे गरजेचे बनले आहे, नाहीतर एक श्वास हा जीवघेणा असेल. याची सुरवात मात्र झालेली आहे. 

-By आरती पवार

Share

14 thoughts on “एक जीवघेणा श्वास : वायू प्रदूषण

 • January 27, 2020 at 10:43 am
  Permalink

  तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टीचा मानवाने विचार करायला हवा. आणि हवा प्रदूषण कसे रोकता येईल त्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याच आभ्यास करुन त्या योजना जागो जागी राबवल्या पाहिजेत..

  Reply
 • January 27, 2020 at 7:01 pm
  Permalink

  प्रदूषण ही जगातील सर्वा समोर उभी असलेली आणि दुर्लक्ष
  न करता येण्यासारखी समस्या आहे तरी सर्वचजन त्या कडे दुर्लक्ष करत आहेत.
  तुम्ही सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली आणि तीही पुराव्या निशी तुमचे खूप खूप कौतुक.
  👍👍 छान लेख आहे

  Reply
 • January 28, 2020 at 8:15 am
  Permalink

  Nice 1 no 😊😊😊

  Reply
 • January 28, 2020 at 1:43 pm
  Permalink

  Waist improvement fact

  Reply
 • January 28, 2020 at 7:18 pm
  Permalink

  🙏🙏🙏

  Reply
 • January 29, 2020 at 10:12 am
  Permalink

  It’s right

  Reply
  • January 29, 2020 at 2:21 pm
   Permalink

   खरोखर , प्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.यावर विचार करायला हवा नाहीतर याचे परिणाम या पृथ्वीतलावरील सर्वांना भोगावे लागतील.हा लेख फारच छान लिहिला आहे.यावर उपाय योजना केल्या पाहिजेत

   Reply
 • January 30, 2020 at 7:56 am
  Permalink

  खरंच खूप प्रत्येकाला स्वच्छतेची सवय लागायला हवी, नाहीतर आजार एवढे पसरतील कि लोके जगायचे सोडून आत्महत्या जास्त करून घेतील. कारण हे आपणच करत असलेले प्रदूषण आपल्यासाठी खूप घातक ठरेल. त्यामुळे प्रत्येकाने विचार करायला हवा.

  Reply
 • January 30, 2020 at 8:05 am
  Permalink

  खुप छान आहे artical.. आपन सर्वांनी विचार रेला पाहीजे यावर..

  Reply
 • January 30, 2020 at 9:40 am
  Permalink

  माहितीत सांगिल्यानुसार आपण या गोष्टी कशा पध्दतीने हाताळता येतील याकडे लक्ष दिले पाहिजे आणि वायू प्रदूषण कसे कमी करता येईल है Practically केले पाहिजे..

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *